- Team ShubhaSurPedia
'शुभसूरपीडिया' - एका स्वप्नाची सुरुवात!
Updated: Jul 3, 2020

मला माझ्या कामात किंवा कुठल्याही गोष्टीत काही अडलं, की कोणाला विचारायच्या आधी मी एकदा Google करून बघते. आणि बऱ्याचदा असं होतं की मला अपेक्षेपेक्षा जास्त छान मदत मिळते तीही एका क्लिकवर! अर्थात तुम्ही म्हणाल यात काय नवल? पण असा कोणताही छान सर्च रिझल्ट मला मिळाला की मला फार गंमत वाटते, की कसं कोणीतरी आपल्याला मदत मिळावी म्हणून काहीतरी छान लिहून ठेवलंय, रेकॉर्ड करून ठेवलंय! अतिशय उपयोगी असं.. एखादा पदार्थ तयार करण्यापासून ते अगदी खिळा कसा ठोकायचा इथपर्यंत आणि एखादं सॉफ्टवेअर कसं वापरायचं इथपासून ते केस सुंदर कसे बनतात इथपर्यंत!
आणि प्रत्येक वेळेस मला वाटतं, की आपण कधी असं काही करू शकू का ज्याने बाकीच्यांना अशी मदत होईल.. गेले बरेच दिवस, किंबहुना महिने, हा विचार डोक्यात होता. लॉकडाऊनच्या निमित्ताने व्हिडियो ब्लॉग हे स्वप्न साकार व्हायला सुरुवात झालीच होती. आणि मनात आलं कि अशी एखादी informative blog वेबसाईट आपण तयार करू शकतोय. ज्यावर वेगवेगळ्या कलाप्रकारांबद्दल आर्टिकल्स असतील, आणि त्यांचा उपयोग होतकरूंना होईल.
लगेच कामाला सुरुवात केली आणि एक वेबसाईट मॉडेल तयार केलं. त्यावर कोणकोणत्या प्रकारचा कन्टेन्ट असू शकेल, त्यातला मी किती लिहू शकेन, बाकीच्या प्रकारांचं काय करायचं, या वेबसाईटचं भवितव्य काय, या आणि अशा बऱ्याच मुद्द्यांवर सखोल विचार केला. बऱ्यापैकी डीप स्टडीनंतर एक कन्स्ट्रक्टिव्ह असं काहीतरी समोर आलं...
..आणि आज तेच तुमच्यासमोर मांडायला सुरुवात झालीय!
'शुभसूर क्रिएशन्स' आणि 'शुभसूर'चा पहिला म्युझिक अल्बम 'दुर्वांकूर' या दोघांना आज नऊ वर्षं पूर्ण झाली!
हेच औचित्य साधून 'शुभसूर क्रिएशन्स' तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन आलंय एक वेब पोर्टल,
"शुभसूरपीडिया!" (ShubhaSurPedia)
काही आर्टिकल्स, स्टोरीज, म्युझिक रिलेटेड, युट्यूब रिलेटेड उपयुक्त टिप्स आहेत, आमचे शुभसूरचे युट्यूब व्हिडियोज आहेत. सध्या एवढ्याच भांडवलावर आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर हे पाऊल टाकलंय! खूप जास्त प्लॅन्स आहेत भविष्यात राबवण्यासाठी. त्या सगळ्यावर यथायोग्य काम चालू आहेच. वेगवेगळा सकस कन्टेन्ट वेळोवेळी अपलोड होतच जाईल. पण बाळगलेल्या अजून एका स्वप्नाच्या मार्गावर पाऊल टाकल्याचं समाधान आणि आनंद अनेक पटींचा आहे!
आणि हो, जर तुम्हांला यात काही लिहायचं असेल, तुमच्यासाठी आम्ही काही लिहावं असं वाटत असेल तरी आम्हांला नक्की कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुमच्यासोबत आणि तुमच्यासाठी काम करायला सज्ज आहे.
जरूर भेट द्या आमच्या वेबसाईटला आणि तुमचे रिव्ह्यूज आम्हांला नक्की कळवा!
https://www.shubhasurpedia.com
धन्यवाद,
सुखदा भावे-दाबके
टीम शुभसूरपीडिया
#shubhasurpedia #encyclopedia #dream #webportal #blog #informative #informativeblog #musicandarts #education #shubhasur #shubhasurcreations #newidea #newconcept #newproject #socialmedia #blogger #seo #searchresult #searchranking