• Team ShubhaSurPedia

किती उद्याच्या निष्पन्नाची धांदलकिती उद्याच्या निष्पन्नाची धांदल

दिवस आजचा अजून सरला नाही

रंग किनाऱ्यावरल्या आयुष्याचा

पाण्यामध्ये जरा उतरला नाही


चाकोरीच्या पल्याड कैसे असते

विचारसुद्धा मनात शिरला नाही

इथेच इथल्या खेळाचा हिशोब

बाकीलाही आकडा उरला नाही


कुठून जाते आयुष्याची त्रिज्या

परीघ कैसा तिलाच पुरला नाही

उण्यापुऱ्या या अस्तित्वाचा गोंधळ

लोळ धुक्याचा मनात विरला नाही


मला दिली मी नजरकैद अदृश्य

श्वास जरासाही किरकिरला नाही

सफेद कॉलर दुडून आतून कोणी

कली किंवा कान्हा अवतरला नाही


© सुखदा भावे-दाबके

© Copyright Protected